कचाकड्या ...
Friday, November 4, 2011
Monday, October 17, 2011
भेद
काही भेद, अभेद असतात
नव्याने भेटले जरी ते
सारे व्रण जुनेच असतात
आज जरी ते आवडत नसले
कधीकाळी ते रोज सकाळी
आरश्यात भेटत असतात
अवखळ अश्राप खेळ , पाठीवरचे व्रण जणू
तोच कंदील घेवून ते
आपली वाट ठरवतात
रोजच रक्तात भिनत असले तरी
कुण्या एका बारीक जखमे सरशी
भळा भळा वाहून जातात
सल मेली जरी, बीजे रुजून राहतात
मृगाच्या पहिल्या थेंबाला झेलताच
पिवळे कोवळे , कोंब फुटून येतात.
Thursday, September 22, 2011
Texan Sun
Bright yellow Texan sun
peeping thru
the carpet of clouds
Just when a red cloud passes by
And out comes the sun
My ride drenched in the red mists of the plume.
Me diving and cruising thru the clouds...playing hide and seek
Is It fair to experience this spectacle
free unannounced and unplanned
Feels like walking amidst the Atlantis in ruins
Now found ..albeit, in my sky or may be miles and miles of dunes
And behind them an angry sky or may be..
An enchanting shadow of a yellow fox
All dressed in streaks of feather in a colorful glory
and the thinketh connecting with the thinker.
Wednesday, August 31, 2011
खुलासे
आश्वस्त बहाणे तुझे
टांगलेले उसासे माझे रोजचेच झालेत
सरावलेले खुलासे तुझे.
Tuesday, August 16, 2011
पहिली मुलगी
पहिली मुलगी .. अशीच येते
तारुण्यात तुझ्या .. मंद वार्या सारखी
तहाठ कॉलरी मधून .. गळया भोवती
असते कधी ती ... घरात तुझ्या
पाठीवर टिच्चून ... अर्ध्या वाटेकर्या सारखी
सवंगडी तुझी ... भावंडा- भोवती
कधी कधी .. अशीच असते ती
दरवळत .. गंधा सारखी
तुझ्या आजूबाजूला .. मित्रांमध्ये आवती-भोवती
तर कधी वाजत गाजत ... आठवा ओंलांडत
टवटवीत .. गुलाबा सारखी
ठसे उमटवत घर भर आणि .. तुझ्या दारा-भोवती
कधी इवल्या हातांनी .. धरत बोट तुझे
आयुष्यात तुझ्या ... प्राजक्ता सारखी
अंगणात तुझ्या बागडते ... तुझ्या पाया-भोवती
Monday, August 1, 2011
बिंदू जरी मी
कोर्या कागदाच्या उजव्या कोपर्यावर
सरळ ओळीत पसरत जातात
भावना सांडत , थोड्या अडखळत
शब्द माझे जुळून येतात
अभिव्याती माझी साधी जरी
विचारांची गाडी बैलांपुढे जरी
अडखळत कधी ..धडपडत कधी
प्रवास माझा निरस जरी
किंबहुना.. किंबहुना .. व्यर्थ नाही
सश्याची झेप माझी नाही
कारिण प्रवास माझा साधा मी
तेवढीच निरस सांगत माझी
व्यर्थ नाही ह्या पटला बिंदू जरी मी
मझाही कॅनवास रंगेल तरी
Wednesday, April 13, 2011
धुके
अस्पष्ट मी..
स्पष्ट तेवढे, डाग माझे
दिसलो तुला जरी समोर मी.
दाखले तेवढे , माग माझे
एकसंध वाटलो जरी
जोडलेले निव्वळ भाग माझे.
भासती उतुंग जरी
निव्वळ पोकळ , शब्द माझे
वाटाड्या वाटलो जरी
एक चकवा ,धुके माझे.
Tuesday, March 29, 2011
पहाड कोरीण मी
सायरन तुझे स्वर,
झुगारून देईन मी
खांद्यावरच्या पिस्साच्यावर
आरूढ होईन मी.
मनुष्य आहे मी.
माझी वाट काट्या मधली..
माझं ध्येय , उंच मेरू जरी
पोहोचण्या तिथे .. पहाड कोरीण मी.
Friday, March 25, 2011
अनोळखी वारा
भर सागरात , माझी ज्योत ..
मंद .. लवत आहे..
तुझ्या शीडातला वारा जणू ..
अनोळखी आहे..
Subscribe to:
Posts (Atom)


